Monday, November 19, 2018

मिरज अध्यापक विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा

जत,(प्रतिनिधी)-
मिरज येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया अध्यापक विद्यालयाच्या  माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने स्नेह मेळावा  मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान झाले.

 माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांच्याहस्ते व माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे,माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोते, माजी प्राचार्य एन. के . फडणवीस, पी जे खोत,प्रा सतीश आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत  करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम शिंगे होते.
   उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह व त्याचवेळी प्रकाशित करण्यात आलेल्या  'स्मृतिगंध' ही स्मरणिका देऊन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सध्या माणसे माणसापासून दुरावत चालली आहेत. या धकाधकीच्या आयुष्यात कोणाला भेटायला वेळ नाही. पूर्वीचा काळ व आताचा काळ यात मोठा फरक आहे, पण सोहळा त्यास अपवाद ठरला.
स्नेह मेळाव्यातील मित्रांनी सामाजिक, राजकीय, व्यवसायक, नोकरीत जे यश संपादन केले त्याबाबत मनोगत व्यक्‍त केले. आजपर्यंतच्या आयुष्याचा आढावा घेताना आपल्या जीवनातील चढ-उतार अनेकांनी नमूद केले. तसेच अनेकांनी आठवणींना उजाळा दिला.या आठवणीने शिक्षक ही भारावून गेले होते.
     द्वितीय सत्रात माजी विद्यार्थ्यांनी बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले.  विचारवंत इंद्रजित देशमुख यांचे 'शिक्षण, शाळा व शिक्षक' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संपतराव गायकवाड यांचे चालू व जुन्या शैक्षणिक घडामोडी व लहान प्रसंगातून महान विचारांची पेरणी कशी करायची याविषयावरील व्याख्यानांने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
     यावेळी प्राचार्य शिंगे म्हणाले की, या कार्यक्रमास
माजी विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पासून  नियोजन करण्याचे काम हाती घेतले होते. १९६८ पासूनच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यापर्यंत पोहचायचे असा निश्चय मनाशी बाळगून प्रयत्न केला त्यामुळे  मेळावा घेण्यात यश मिळाले. याचे  मला समाधान वाटते.प्रा. उत्तम पांढरे , प्रा. विक्रम पाटील, प्रा. विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार पाटील,कुंदन जमदाडे,  नितेंद्र जाधव, सिद्धेश्वर कोरे यांनी नेटकेपणाने संयोजन केले.यावेळी प्रा. सुमन वांगीकर, प्रा. अनघा कोटीभास्कर, आर. जी. टोणे, अन्सार शेख, विनायक शिंदे, बाळू गायकवाड, प्रमोद काकडे, प्रदीप मालगावे,संभाजी कोडग,लखन होनमोरे,शशिकांत भजबळे, दयानंद मोरे आदी उपस्थित होते.महाविद्यालयाचे सर्व माजी प्राचार्य, माजी प्राद्यापक व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मेळावा यशस्वीरित्या पार पडला.

फोटो ओळ-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा प्रसंगी इंद्रजित देशमुख यांच्याहस्ते 'स्मृतिगंध' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी इतर मान्यवर

No comments:

Post a Comment