जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील माडग्याळ येथील ग्रामपंचायतमधील सदस्यांनी
नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दुसरा सदस्यही कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात
आले.
यावेळी जत शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे, जिल्हा उपप्रमुख तम्मासो कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली
भाजपमधून दोन ग्रामपंचायत
सदस्य निवडून आले होते. सरपंचपदाचा उमेदवार थोडक्या मतात पराभव
झाला होता. परंतु आपल्या नेत्यांकडून कोणताही चांगला प्रतिसाद
व कार्य होत नसल्याचे शल्य सदस्यांमध्ये आहे. उलट शिवसेनेने जत
तालुक्यात ‘म्हैसाळ’मधून वगळलेल्या गावांचा
समावेश करण्यासाठी पाठपुरावा चालू केला आहे, हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत
सदस्य जेटलिंग कोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर सौ.
गोदाबाई जाधव याही शिवसेनेत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत,
अशी चर्चा आहे. असे झाल्यास विद्यमान पंचायत समिती
सदस्यांना धक्का बसणार आहे. सध्या आम्हाला जत तालुक्याच्या वंचित
गावासाठी पाणी गरजेचे आहे. ते काम शिवसेना करीत आहे. दरम्यान, जाडरबोबलाद येथील भाजपचे काही सोसायटी सदस्य
व ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस संपर्कात असून ते लवकरच डॉ. विश्वजित कदम उपस्थितीत प्रवेश करणार आहेत; तर माडग्याळच्या
ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला पूर्वभागात उतरती कळा लागली
असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment