जत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक
गजानन वसंत कांबळे हे 20 हजार रुपयांची लाच
घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली
जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने
तक्रार दिल्यानुसार सापळा रचून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले. या तक्रारदार सदस्याची एका सोलर कंपनीच्या मध्यस्थामार्फत फसवणूक झाली होती.
त्यांनी जत पोलिसांत काही जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास गजानन कांबळे यांच्याकडे आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करून फसवणुकीची रक्कम मिळवून देतो, असे सांगितले होते. यानुसार आगाऊ 50 हजार रुपयांची रक्कम देण्याचे व उर्वरीत दीड लाखांची रक्कम काम झाल्यावर देण्याचे
ठरले होते. या बाबतची तक्रार लाचलुचपतकडे तक्रारदाराने केली होती.
त्यानुसार आज जत पोलिस ठाण्यात सापळा
लावला असता यावेळी गजानन कांबळे यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी
केली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस उपआयुक्त संदीप दिवाण,
अप्पर पोलिस उपआयुक्त राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस
उपधिक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस कर्मचारी संजय कलकुटगी,
भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, बाळासाहेब
पवार, अविनाश सागर यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment