इच्छुकांची गर्दी;पृथ्वीराज
चव्हाण यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी
जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळूहळू वातावरण तापू लागले आहे. सांगली जिल्हा हा बालेकिल्ला पण मोदी
लाटेत हा किल्ला भुईसपाट झाला. आता मोदी लाट ओसरली असून याचा
लाभ घेण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. त्यामुळे साहजिकच लोकसभेसाठी
काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असून माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील,
विशाल पाटील, शहर- जिल्हाध्यक्ष
पृथ्वीराज पाटील यांच्यासह पाच जण इच्छुक आहेत.
नुकतीच मुंबईत काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत या इच्छुकांनी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली.
यावर जिल्हास्तरीय नेत्यांची बैठक घेऊन उमेदवारीचा अंतिम निर्णय घेण्याची
जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देण्यात आली. त्यामुळे इच्छुकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, गतनिवडणुकीत काँग्रेसला अपयश आले होते.
त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून तयारीला लागा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूम ीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईत सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, माजी
मंत्री सतेज पाटील, हुसेन दलवाई, आमदार
विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव
पाटील, प्रदेश चिटणीस सत्यजीत देशमुख, माजी
केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मंगेश चव्हाण, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील आदी
उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व मतदारसंघाची
स्वतंत्र बैठक मुंबईत घेतली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा
खासदार अशोक चव्हाण यांनी घेतला. सांगली लोकसभेसाठी इच्छुकांनी
नावे द्यावीत, असे आवाहन प्रदेशने केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून पाच जणांची नावे आली. माजी केंद्रीय
राज्यमंत्री प्रताक पाटील यांच्यासह शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज
पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व नामदेवराव
मोहिते यांनी लोकसभेला इच्छुक असल्याचे प्रदेशाध्यक्षांना सांगितले; तर अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्री पाटील यांच्या नावाची शिफारस माजी
मंत्री सतेज पाटील यांनी केली. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा
बालेकिल्ला आहे. गतनिवडणुकीत भाजपकडून काँग्रेसला पराभवाचा धक्का
सहन करावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा
मिळविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खामदार
अशोक चव्हाण म्हणाले, सांगली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे.
त्यासाठी जिल्ह्यतील सर्व नेत्यांनी कामाला लागणे आवश्यक आहे.
त्याची तयारी आतपाासून सुरू करावी. लोकसभेसाठी
पाच जणांची नावे चर्चेत आहेत. जिल्हास्तरावर बैठक घेऊन यापैकी
एक नाव निश्चित करून प्रदेश काँग्रेसकडे पाठवावे, अशा सूचना खासदार चव्हाण यांनी दिल्या. सांगली लोकसभा
मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली.
No comments:
Post a Comment