जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ
(ता. जत) येथील शिवसेना प्रणीत
युवासेनाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर शेतकरी कट्टा व महादेव मंदिर या ठिकाणी
घेण्यात आले. याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
250 रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली. मोफत नेत्र
तपासणी शिबिरास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या
हस्ते करून प्रारंभ करण्यात आला. युवासेना माडग्याळ यांच्यावतीने
बुधवारी सकाळी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माडग्याळ
हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. गरजू गोरगरिबांनी या मोफत नेत्र
तपासणी शिबिरामध्ये सहभागी होऊन तपासणी करून घेतली. अशाप्रकारची
शिबिरे घेऊन दुष्काळी जनतेला सहकार्य करावे, असे मान्यवरांनी
सांगितले.
या शिबिरामध्ये नेत्रोपचार, मोतीबिंदू, चष्मा, काचबिंदू,
लासरू, तिरळेपणा, पापणीचे
दोष अशा सर्व प्रकारच्या या शिबिरामध्ये तपासणी केली गेली. शिबिराचा
एकूण 250 रुग्णांनी लाभ घेतला. त्यातील
40 जणांना उपचारासाठी पाठवण्यात आले. या शिबिराचे
संयोजक राहुल कोळी (युवासेना तालुकापमुख) व औदुंबर पोतदार (युवासेना तालुका) आयोजित केले होते. शिबीराला शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख
रेणुकाताई देवकते, विठ्ठल कोळी शिवसेना, भैय्या दुधाळ युवासेना सांगली, सरपंच आपू जती,
सोसायटी चेअरमन श्रीशेल माळी, सुरेश हाक्के,
विकी वाघमारे व नागरिक भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment