जत,(प्रतिनिधी)-
राज्य
सरकारने प्राध्यापक भरतीचा निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाहीर केला आहे,मात्र हा निर्णय जाहीर करून महिना उलटत आला तरीही भरती सुरू झाली नसल्याने
नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य सरकारच्या
शिक्षण विभागाने 3 नोव्हेंबरला प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर
केला. यात विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील
प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी 40 टक्के
जागांवरील भरतीला मान्यता दिली आहे.
सरकारने प्राध्यापक
तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांच्या चार हजार 738 जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात
सहाय्यक प्राध्यापक 3 हजार 580, शारीरिक शिक्षण संचालक 139,ग्रंथपाल 163, प्रयोगशाळा सहाय्यकाच्या 856 जागांचा
समावेश आहे.
दिवाळीपूर्वी
प्राध्यापकांना दिलासा देण्यासाठी सरकारने घाईघाईने पदभरतीला मान्यता दिली. प्राध्यापकांचे
आंदोलन माघारी घेण्यात आले. आता निर्णय घेऊन महिना होत
आला तरीही सरकारने अद्याप भरती प्रक्रिया सुरू केली नसल्याने प्राध्यापक
संघटनांकडून संतप्त प्रक्रिया व्यक्त होत आहे.
ॠरकारने सहाय्यक
प्राध्यापक भरतीची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, तसेच प्राध्यापकांच्या
एकूण रिक्त जागांपैकी केवळ 40 टक्के जागांवरील
नव्हे तर 100 टक्के रिक्त जागांवरील भरती
प्रक्रिया राबवण्यात यावी, अन्यथा पुन्हा डिसेंबरपासून
आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा प्राध्यापक संघटनांनी
दिला आहे.
No comments:
Post a Comment