एका आठवड्याचे ‘सात‘
वार असतात. ‘आठवा‘ वार आहे
‘परिवार‘; तो ठीक असेल तर सातही वार ‘सुखाचे‘ जातील ‘जन्म हा एका थेंबासारखा
असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम
एका त्रिकोणासारखे असतं, पण मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो; परंतु चांगला
स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.
*****
ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा
होता कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता कितीही असला नोकरीचा लळा तरी
माझ्या शाळेचा फळाच बरा होता वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा गुरुजींच्या छडीचा
मारच बरा होता मोबाईलवरील रग्गड गेमपेक्षा मैदानी खेळाचा थाटच बरा होता आलो शहरात सुख
मिळविण्यासाठी पण गड्या आपला गावच बरा होता
*****
माणूस ‘कसा दिसतो‘
ह्यापेक्षा, ‘कसा आहे‘ ह्याला
महत्त्व असतं... कारण शेवटी, सौंदर्याचं
आयुष्य तारुण्यापर्यंत, तर, गुणांचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं...
*****
कोणाजवळही
काही बोलताना फार विचारपूर्वक बोला... कारण... काही माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि हसून सांगतात.
*****
नवरदेव ः महाराज, वधूला डाव्या
बाजूला बसवू की उजव्या बाजूला? महाराज ः कुठेही बसवा.
नंतर ती तुमच्या डोक्यावरच बसणार आहे.
*****
आज-काल पहिलीची पोरं
केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं
होणार नाही!
----------------
बायको
: अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना.
मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा
: हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!
-----------------
दीपिका
अन रणवीरचं लग्न अवघ्या 30 लोकांच्या उपस्थित झाले. तेवढे तर आमच्या लग्नात रुसलेले असतात.
No comments:
Post a Comment