तम्माजी कुलाळ यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
एकेकाळी जत तालुक्यातल्या गावागावांमध्ये
शिवसेनेची शाखा होती. आज ती परिस्थिती नाही,पण येथून पुढच्या काळात तालुक्यातल्या पुन्हा एकदा प्रत्येक गावात शिवसेनेच्या
शाखा सुरू करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ यांनी
दिली.
कुलाळ पुढे म्हणाले, तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे. यासाठी प्रत्येक
गाव निहाय आमचा दौरा सुरू असून प्रत्येक गावागावात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार तळागाळात पोचण्यासाठी गाव तिथे
शाखा करण्याचा आमचा संकल्प आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील
42 गावांना पाणी आले पाहिजे यासाठी शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न
करीत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनी
1995 साली महामंडळाची स्थापना करून या योजनेला मोठ्या प्रमाणात गती दिली
होती. यापुढे आता तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावात म्हैसाळचे
पाणी आले पाहिजे यासाठी आम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांना भेटून या योजनेला गती देण्यासाठी
वारंवार प्रयत्न केला आहे.
माडग्याळसह परिसरातील आठ गावांना पाणी मिळावे यासाठी
शिवसेनेनेच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. आता तालुक्यातील
पूर्व भागातील प्रत्येक गावात पाणी मिळाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही.
संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले असले तरी या कार्यालयास जादा
अधिकार न दिल्याने अनेक नागरिकांना पुन्हा त्याच कामासाठी जतला जावे लागते.
यामुळे पुन्हा आर्थिक फटका बसत आहे. हे टाळण्यासाठी
जत तालुक्याचे तातडीने विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके करण्यासाठी शिवसेना प्रयत्न
करीत असल्याचे कुलाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment