Tuesday, November 20, 2018

मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक बँकेच्या वतीने सत्कार

(लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सत्कार शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष किरण गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष राजाराम सावंत ,दयानंद मोरे, दीपक कोळी,शशिकांत बजबळे आदी उपस्थित होते.)

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील लेखक ,शिक्षक आणि पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे यांना काँग्रेस सेवा दलाचा 'साहित्य रत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जत येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानी बँकेचे उपाध्यक्ष राजाराम सावंत होते. शिक्षक समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते श्री. ऐनापुरे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, बँकेचे माजी अध्यक्ष शशिकांत बजबळे,तुकाराम गायकवाड ,संचालक हरिभाऊ गावडे,तालुकाध्यक्ष रामराव मोहिते, दीपक कोळी,दरेप्पा कट्टीमनी,राजू खंदारे, विठ्ठल मुचंडी, श्री. कोटलगी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment