जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पतसंस्थेची भूमिकाही महत्त्वाची
आहे. यासाठी जिव्हाळा व्यापारी नागरी पतसंस्थेने तळागाळातील सभासदांना
कर्ज पुरवठा करून त्यांचा पाया भक्कम करावा, असे प्रतिपादन मार्केट
कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले.
जत येथील
जिव्हाळा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उदघाटन श्री. जमदाडे
यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास पतसंस्थेचे
अध्यक्ष डॉ. समाधान जगताप, उपाध्यक्ष महेश
मालगते, सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार, सचिन माने, विजय रुपनर, अण्णासो
भोसले, आनंद गायकवाड, सोमनाथ स्वामी,
विजय शिंदे उपस्थित होते. प्रकाश जमदाडे म्हणाले,
जत तालुका जरी दुष्काळी तालुका असला तरी तालुक्यातील सहकारी क्षेत्र
हे फार मोठे आहे. या तालुक्यातील सर्वसामान्य सभासदांना चांगला
पतपुरवठा करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याची जबाबदारीही पतसंस्थांची असून त्यांनी
ती पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment