जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींना सीएससी या कंपनीमार्फत डाटा ऑपरेटर म्हणून 90 तरुण काम करीत आहेत. यांना गेल्या 18 महिन्यांपासून मानधन मिळालेले नव्हते.यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर हालचाली होऊन दोन दिवसांत मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे सेंटर ऑफ इंडिअयन ट्रेंड युनिअन(सीरायटीयू)या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत कोळी यांनी सांगितले.
श्री. कोळी म्हणाले की,कोळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएससी या कंपनीमार्फत तालुक्यातल्या 90 ग्रामपंचायतींमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून गेल्या जून 2017 पासून काम करीत आहेत. मात्र त्यांना आजतागायत मानधन मिळाले नव्हते. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यावर जिल्हा परिषद पातळीवर हालचाली होऊन जिल्हा आणि तालुका समन्वयक तसेच अधिकारी पातळीवर आज दि. 19 रोजी बैठक झाली. यावेळी काही तांत्रिक बाबीमुळे मानधन प्रक्रिया रखडली आहे, असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे व येत्या दोन दिवसांत डाटा ऑपरेटर यांना मानधन मिळेल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी होणारे बेमुदत उपोषण माघारी घेत आहोत. तसे पंचायत समितीला लेखी कळवण्यात आल्याचेही श्री.कोळी यांनी सांगितले. या डाटा ऑपरेटरांना महिन्याला सहा हजार रुपये मानधन देण्यात येते. 18 महिन्याचे सुमारे 97 लाख रुपये डाटा ऑपरेटरांचे पंचायत समिती मानधनपोटी देणे आहे.
No comments:
Post a Comment