जत,(प्रतिनिधी)-
जात पंचायत समिती उपसभापती शिवाजी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार विलासराव जगताप यांच्याकडे काल सादर केला आहे. हा राजीनामा सोमवारी सभापती सुशिला तावंशी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, याला आमदार विलासराव जगताप यांनी दुजोरा दिला आहे .
उपसभापती शिवाजी शिंदे यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस व जनसुराज्य युतीचे सदस्य अँड. आडव्याप्पा घेरडे यांची निवड होण्याची शक्यता आहे . पंचायत समिती मध्ये भाजपा व विकास आघाडी यांची संयुक्त सत्ता आहे . भाजप ९ , काँग्रेस ७ , जनसुराज्य एक , वसंतदादा विकास आघाडी एक याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे , नुकत्याच झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत जनसुराज्य व काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अँड. आडव्याप्पा घेरडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता . त्याच्या बदल्यात घेरडे यांना उपसभापती पदाची संधी भाजपाकडून मिळणार आहे असे समजते. याशिवाय घेरडे यांच्या नावावर सर्व सदस्यांचे एकमत झाले आहे .अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली आहे.
सभापती सुशिला तावंशी उपसभपती शिवाजी शिंदे यांचा राजिनामा सोमवारी मंजूर करून पुढील कारवाईसाठी प्रशासनाकडे सादर करणार आहेत. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नवीन उपसभापती यांची निवड करण्यासाठी प्रशासनाकडून पं.स.सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment