जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासन कमी पडणार नाही . टंचाई निवारण कामात हायगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मच्याऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल .पाणी व चारा टंचाई जाणवत असलेल्या गावाचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करून त्याचा अहवाल दिल्यानंतर प्रशासन तेथे तात्काळ पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करेल. अशी ग्वाही जत विभाग प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली ते पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या जत तालुका टंचाई आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते.
पंचायत समितीच्या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पाणी व चारा टंचाई जाणवत असलेल्या गावाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून तेथे तात्काळ टँकर सुरू करणार आहोत . पशुधन व चारा उपलब्ध आहे किंवा नाही याची माहिती गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक गावपातळीवर जमा करत आहेत. सध्या चारा उपलब्ध आहे किंवा नाही . त्या गावात किती पशुधन आहे . आणि त्यांना किती चारा लागणार आहे . याची माहिती संकलित करून त्यानंतर शासन निर्णय घेणार आहे .असेही प्रांताधिकारी यानी यावेळी सांगितले .
शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये असे आदेश वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत . शेतकऱ्यांच्या चालू वीज बिलातून साडेतेहत्तीस टक्के सवलत देण्यात येणार आहे त्याची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यातील बिलातून सुरू होणार आहे .रोहयो कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे . मजुराकडून कामाची मागणी झाल्यानंतर त्या गावात तात्काळ काम सुरू करण्यात येणार आहे . म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून घेण्यासाठी संबधिताना सूचना देण्यात आल्या आहेत . म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडून तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेला पाणी देण्यासाठी व प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि शासकीय पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी स्थानिक व अनुभवी शाखा अभियंता याना बरोबर घेवून येत्या दोन - तिन दिवसात आम्ही संपूर्ण कँनाँलची पहाणी करणार आहे . त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी सांगली यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे . त्यांनी या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . असेही प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावेळी सांगितले . दुष्काळी तालुक्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सर्व उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. दुष्काळाची दाहकता संपूपर्यत त्याची अंमलबजावणी सुरू ठेवण्यात येणार आहे . नागरिकांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी टंचाई निवारण कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान प्रांताधिकारी यांनी केली आहे . या बैठकीस तहसीलदार सचिन पाटील , गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे , संख (ता. जत) येथील अतिरिक्त तहसीलदार अर्चना पाटील, पंचायत समिती सभापती सुशील तावशी , उपसभापती शिवाजी शिंदे, जि. प .आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवीपाटील , जि. प. सदस्य सरदार पाटील, प्रभाकर जाधव , अँड. आडव्याप्पा घेरडे , श्रीदेवी जावीर , विष्णू चव्हाण इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment