Friday, November 16, 2018

उमदी परिसरात लोडशेडिंगचा फटका


द्राक्षबागा वाळू लागल्या; शेतकरी संघर्षाच्या तयारीत
जत,(प्रतिनिधी)-
उमदी (ता. जत) हे जत तालुक्यातील शेवटचे गाव असून या गावातील शेतीची वीजयंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णपणे बिघडली असून दिवसा व रात्रीमहावितरणच्या लोडशेडिंगचा करंट मात्र शेतकर्यांना बसत असून या महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील शेतकर्यांच्या डाळिंब, द्राक्षबागा वाळत आहेत. शेतकरी आता संघर्षाच्या तयारीत आहे, याची जबाबदारी घेऊन महावितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे.
उमदी (ता. जत) या गावची लोकसंख्या वीस ते पंचवीस हजार आहे. या परिसरात दोन ते अडीच हजार एकरावर द्राक्षबागा व दोन हजार एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत. तसेच लिंबू, पेरूबागा मोठ्या प्रमाणात असून नगदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात भारनियमन आहे. भारनियमनाची वेळ महावितरण कंपनीकडून बदलण्याचा शिरस्ता चालू केला आहे. तथापि, आठवड्यातून अनेक वेळा हे भारनियमन बदलले जाते. त्याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. गेल्या अनेक महिन्यांत दिवस आणि रात्रीच्या वेळी समन्वय साधून भान निर्माण केले जायचे. त्यामुळे रात्री पिकांना पाणी देता आले नाही, तरी दिवसातील काही वेळ पाणी देता येत असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून वेगवेगळे निर्माण केल्यामुळे याचा फटका हा शेतकर्यांच्या पिकांना बसत आहे. शेती विद्युत पंपाच्या भारनियमनाची वेळ बदलत असल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देताना शेतकर्यांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीने शेतकर्यांच्या सोयीनुसार भारनियमन करावे असे अनेक दिवसांपासून शेतकर्यांची मागणी आहे. मात्र दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून रात्रीच्या वेळी भारनियमन होत असल्याने शेतकर्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील महावितरण कंपनीतील अनेक कर्मचारी हे बेफिकीर आहेत.
नियमानुसार असलेले अनेक वेळा एका तासात दहा ते वीस वेळा वीज जाण्याचे प्रकार होतात. अनेक ट्रान्स्फॉर्मर मोठ्या प्रमाणात जळत असून शेतकर्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार महावितरण कंपनी करीत असून आहे. शेतकरी वेळेवर वीजबिल भरतात. मात्र त्यांना वेळेवर वीज देणे हे बंधनकारक असतानाही ती वेळेवर मिळत नाही. याची वरिष्ठांनी वेळीच दखल घ्यावी; अन्यथा उमदी येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश काळे यांनी दिला आहे. वीज व्यवस्थित येत नसल्यामुळे या परिसरातील द्राक्ष, डाळिंबाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून अनेक शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात असून याची दखल महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घ्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment