Saturday, November 17, 2018

‘जागतिक शौचालय दिन’ 19 नोव्हेंबरला


जत,(प्रतिनिधी)-
केंद्र सरकारच्या वतीने देशातस्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धाआयोजीत करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 9 ते 19 नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणार्या दहा जिल्हा परिषदांचा केंद्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.
 या स्पर्धेत सांगली जिल्हा परिषदेनेही सहभाग घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन विभागाकडून देण्यात आली. स्वच्छ भारत मिशनची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आली असून, मार्च 2017 मध्ये सांगली जिल्हा हागणदारीमुक्त झालेला आहे. जिल्ह्यात हागणदारी मुक्त झालेले गावांमध्ये स्वच्छतेची शाश्वतता टिकविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेण्यात येत आहे. 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने 9 ते 19 नोव्हेंबर दरम्यानस्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये वर्तणूक बदलासाठी गृहभेटी करून शौचालय वापराबाबत मार्गदर्शन करणे, असे उपक्रम राबवले जात आहेत.

No comments:

Post a Comment