जत,(प्रतिनिधी)-
नवीन शासन नियमानुसार आता शैक्षणिक सहल केवळ अभ्यास संबंधित स्थळी नेण्यास परवानगी राहणार आहे. वाहतुकीकरिता वापरण्यात येणारी बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस सेवेचा वापर करावा लागणार आहे. याकरिता शिक्षणाधिकार्यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा व महाविद्यालयांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे लागणार आहे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सूचना शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे शैक्षणिक सहली काढता येणार नाही. काही विद्यार्थी शिक्षक लापरवाहिने वागत असल्याने सतत अपघात वाढत आहे. अनेकांचे प्राणसुद्धा यात गेले आहे. पालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने शिक्षण विभागाने सत्र २0१८-१९ पासून सहल आयोजनाबाबत कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता विशेष जोखीम व काळजी घेऊन शाळा, महाविद्यालयांना पुढे जावे लागणार असल्याने दिवाळीच्या सुट्टय़ानंतरच्या शालेय सहलीच्या आयोजनाबाबत जत तालुक्यातील शाळा व्यवस्थापकांसह शिक्षक वर्ग सावध पवित्रा घेताना दिसत आहे.

शालेय जीवनात सहल अविस्मरणीय
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्या-त्या वयात विशेष काळ असतो. त्यापैकी विद्यार्थी दशेत शालेय सहल त्याचे नियोजन, अनुभव निराळाच असतो. त्यापासून विद्यार्थी वंचित राहिला तर त्यावेळीच महत्व आज असू शकत नाही. याकरिता संबंधितांनी जागृत, सतर्क तसेच गंभीर असल्यास विपरित घटनांवर आळा बसू शकतो,अशी प्रतिक्रिया पालकांकडून येत आहे.
No comments:
Post a Comment