Tuesday, November 6, 2018

दूध उत्पादक सभासदांना गृहपयोगी साहित्य वाटप


जत, (प्रतिनिधी)-
रेवनाळ ( ता जत ) येथील  रेवनसिद्ध दूध संकलन केंद्राच्या  वतीने  दुध उत्पादक सभासदांना  दिपावली निमित्त गृहपयोगी साहीत्याचे वाटप करण्यात आले . यावेळी बोलताना जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे म्हणाले की सालाबाद प्रमाणे दीपावली निमित सर्व  सभासदाना  साखर दाळ रवा , मैदा , खाद्यतेल इत्यादी  साहित्य मोफत वाटप करण्यात आले आहे .  संस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदाना आर्थिक मदत होणार आहे .यापुढील काळात संस्था सभासदासाठी  नवीन उपक्रम हाती घेईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .  रेवनाळ ग्रामपंचायत  उपसरपंच मनोहर  वाघमोडे , दुध सोसायटीचे अध्यक्ष आबसहेब पुजारी , जत कन्या हायस्कुलचे मुख्याध्यापक  ए .  बी .लोखंडे ,    एम. बी . लोखंडे , माजी उपसरपंच मारुती वाघमोडे , पोलिस पाटिल बिरुदेव वाघमोडे व   ग्रामस्त आणि सभासद यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment