Friday, November 16, 2018

पांढरेवाडीचे श्रीमंत करपे यांचा शिवसेनेत प्रवेश


जत,(प्रतिनिधी)-
पांढरेवाडीचे श्रीमंत करपे यांनी भाजपला रामराम ठोकत राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जत तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाळ, जेटलिंग कोरे आदी उपस्थित होते.
जत तालुक्यात अंकुश हुवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकत आहे. पूर्वी शिवसेना ही तालुक्यात नावापूर्तीच होती मात्र अंकुश हुवाळे यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यात नवसंजीवनी मिळवून देताना इनकमिंग वाढवले असून हळूहळू तालुका शिवसेनामय होत आहे. सांगली जिल्हा दौर्यावर असलेले राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित जत पूर्वभागाचे व पांढरेवाडीचे नेते श्रीमंत करपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जत तालुक्यात शिवसेना वाढीस गती मिळाली असून शिवसेनेत येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. जत तालुक्यात शिवसेना एक नंबरला नेणार आहे, असे अंकुश हुवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment