Thursday, November 22, 2018

जतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकांच्या रिक्त जागा


विद्यार्थ्यांचे नुकसान;कारभार सुधारा:युवक काँग्रेसची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य आणि शिक्षक यांच्या रिक्त जागा असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केंद्राला भेट देऊन याचा भांडाफोड केला. रिक्त जागा भरून कारभार सुधारला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून शासनाने जत येथे सुसज्ज इमारत बांधून पाच विविध विभागाच्या प्रशिक्षणाची सोय केली आहे. याठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,मात्र शिक्षकच नसल्याने शिक्षणाची मोठी वाताहत झाली आहे. फिटर विभागाला गेल्या अडीच महिन्यापासून शिक्षक नाही. या ठिकाणी फक्त दोनच शिक्षक कार्यरत असून प्राचार्य पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. सध्या याठिकाणी सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास माने यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली असता,त्यांना अत्यंत विदारक चित्र दिसून आले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षक नसल्याने व्यवस्थितरित्या प्रशिक्षण मिळत नाही. सगळा कारभार अनागोंदीचा आहे. वरिष्ठ कार्यालयाने येत्या काही दिवसांत शिक्षक दिले नाहीत आणि कारभार सुधारला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी रमेश कोळेकर, अनिल पाटील, राहुल बुवा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment