10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली,(प्रतिनिधी)-
विशेष
पोलीस पथकाने सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडील
सहा लाख रुपयांचा गांजा, दोन चारचाकी वाहने आणि तीस हजाराची रोकड
असा दहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगलीतील
पत्रकारनगर नजीकच्या रस्त्यावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्यांमध्ये राम सोमलिंग व्हनमाने (वय 24, सांगली), विवेकानंद विकास
बोडरे (वय 25) आणि विनायक बसाप्पा मालेदार
(वय 24, दोघेही बामणी, ता.
मिरज) आदींचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने केली.
शहरातील शंभरफुटीवरून पत्रकारनगरम ार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणार्या रस्त्यावर पोत्यामध्ये गांजा भरून काहीजणवक्रीसाठी येणार असल्याची माहिती
विशेष पोलीस पथकाचे प्रमुख श्री. डोके यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्या रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती.
संशयित दोन चारचाकीतून तेथील गौस बॉडी बिल्डर या गॅरेजच्या समोर येताच
पोलिसांनी त्या गाड्या रोखल्या. माहिती देणार्याने संशयितांच्या कपड्याचे वर्णन केले होते, त्याप्रमाणे
तीन संशयित त्या गाड्यांमध्ये सापडले. त्या तिघांनाही ताब्यात
घेऊन गाड्यांमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये तयार साडेएकोणीतीस किलो गांजा पोत्यात
भरलेला सापडला.
या कारवाईत संशयितांनी वापरलेल्या मारुती रिटज् (एमएच 13 एसी 5616) आणि मारुती आल्टो
(एमएच 10 ई 8342) या दोन
चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक
शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. डोके, उपनिरीक्षक शरद माळी, महेश डोरगे, हवालदार मारुती मोरे, दीपक ठोंबरे, मुद्दसर पाथरवट, मोतीराम खोत, अरुण
पाटील, सचिन जाधव, सुहिल कार्तियानी,
प्रशांत माळी, ऋषिकेश सदामते, गौतम कांबळे, संतोष चव्हाण, सुप्रिया
साळुंखे, ज्योती चव्हाण यांच्या पथकाने यशस्वी केली.
No comments:
Post a Comment