Thursday, November 22, 2018

परीक्षा शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांना पुरावा द्यावा लागणार

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील 180 तालुक्यांसह 268 महसुली मंडळांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहेत्याचबरोबर इथल्या जनतेला सवलतीही जाहीर केल्या आहेतयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे.परंतु यासाठी आता विद्यापीठराज्य तंत्र शिक्षण मंडळांकडे विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहेतशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
यावर्षी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये नागरिकांना आठ प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत्यात या गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परीक्षा शुल्काचाही समावेश आहेमात्र यासाठी संबधित गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांकडे दुष्काळग्रसत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहेदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी परीक्षा शुल्क आकारले असल्यास संबंधित विद्यापीठानेसंस्थेनेमंडळाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र असल्यास त्या विद्यार्थ्यांना 50 टक्के परीक्षा शुल्क परत करावे.त्यासाठी तो पात्र नसल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश संस्थांवरील असल्यास 100 टक्के परीक्षा शुल्क परत करावेतसेच ज्या विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परीक्षा शुल्काची50 टक्के रक्कम प्राप्त होईल आणि त्याने विद्यापीठ अथवा संबंधित संस्थेकडे परीक्षा शुल्क अद्यापही भरले नसल्यास त्या विद्यार्थ्याने ही रक्कम 15 दिवसांत त्या त्या संस्थेकडे भरणे बंधनकारक राहील,असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment