Wednesday, November 28, 2018

डॉ. अशोक खाडे यांना सांगली भूषण पुरस्कार जाहीर


जत,(प्रतिनिधी)-
 विश्वजागृती मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा सांगली भूषण पुरस्कार यावर्षी प्रसिध्द उद्योगपती, दास कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. अशोक दगडू खाडे यांना जाहीर करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

 या पुरस्काराची घोषणा विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी केली. गेल्या 22 वर्षांपासून विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्या व्यक्तीस सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जाहीर करण्यात आलेले सन्मानमूर्ती डॉ. अशोक खाडे हे मूळचे तासगाव तालुक्यातील पेडसारख्या छोट्या खेड्यातून  आले. चरितार्थ अणि शिक्षणासाठी त्यांनी मुंबईला प्रस्थान केले. मुंबईत त्यांनी माझगाव डॉक लि. या कंपनीत नोकरी पत्करली. त्या काळात अतिशय खडतर आयुष्य जगत जिन्याखाली राहून कष्ट सोसून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. नोकरी करताना बी. . सायकॉलॉजी, एम. फिल. फिलॉसॉपी आणि डॉक्टरेट मिळवली. नोकरी करताना त्यांनी आपली गुणवत्ता दाखवून डिझाईन सेक्शन व क्वालिटी कंट्रोल या विभागात नैपुण्य मिळवले. कंपनीने त्यांना जर्मन या ठिकाणी पाणबुड्या बनवण्यासाठी पाठवले.
1992 ला नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू केला. आज दास ऑफ शोअर, इंजिनिअरिंग ,दास ऑफ पेट्रोलिमय सर्व्हिसेस, आबुधाबी दा इन्स्ट्रयूमेंटेशन, दास मरीन सेज प्रा. लि. अशा अनेक कंपन्या कार्यरत आहेत. तीन हजारांहून अधिक लोकांना रोजगा मिळाला आहे. अनेक परदेशी कंपन्याबरोबर ते सहभागी असून भारतातील शिपिंग ऑफशोअर क्षेत्रातील मोठ्या कंपन्याबरोबर त्यांचा व्यवहार चालतो. विश्वजागृती मंडळाने आतापर्यंत नेत्रविशारद डॉ. भैय्यासाहेब परांजपे, खासदार अण्णासाहेब गोटखिंडे, प्रख्यात गायिका आशा भोसले, श्रीमती राजमतीआक्का पाटील, उद्योगपती बाबूकाका शिरगावकर, क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, सुप्रसिध्द सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, बुध्दिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर, रामसाहेब वेलणकर आदींना सन्मानित केले आहे.

No comments:

Post a Comment