Saturday, November 17, 2018

देव कळल्याशिवाय जीवनात स्थिरता नाही डॉ. आप्पासाहेब पाटील


जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी देव कळल्याशिवाय जिवनामध्ये स्थिरता प्राप्त होणार नाही आणी स्थिरता प्राप्त झालेशिवाय जिवनामध्ये आनंद प्राप्त होणार नाही असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे प्रचारक डॉ. आप्पासाहेब पाटील प्रचारक यांनी केले.
जत येथील निरंकारी मंडळाचे कर्मयोगी सोपान सौदागर महात्माजी यांनी बांधलेल्या नुतन इमारतीच्या गृहप्रवेशनिमीत्त आयोजित विशेष प्रचार सत्संग सोहळ्यामध्ये पाटील बोलत होते. पाटील पुढे म्हणाले मुळातच घर वास्तु ही शांतच असते आवश्यकता असते वास्तुविशेषाची. त्या वास्तुमध्ये जी व्यक्ती वास्तव्य करणार आहे त्या व्यक्तीचे डोके शांत असल्यास घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल. सुत्रसंचलन विजय टेंगले यांनी केले. आबासाहेब काटे,सुरेश गुजले यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास भाविक भक्त उपस्थित होते. नियोजन जोतिबा गोरे, संभाजी साळे यांनी केले.

No comments:

Post a Comment