दुष्काळामुळे
ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
गुड्डापूर येथे दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
चार दिवसांवर आलेल्या यात्रेमुळे देवस्थानला पाणी पुरवठा करणे कसरतीचे
ठरणार आहे. गावात व वाडी-वस्तीवर पाणीटंचाई
प्रकर्षाने जाणवते आहे.
ग्रामपंचायतीने
टँकर मागणीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयास यांना दिला आहे; मात्र
अजून टँकर दिलेला नाही.
त्यामुळे नागरिक व भाविकांमध्ये तीव्र
भावना निर्माण झाल्या आहेत. या परिसरामध्ये गेली दोन महिने झाले
पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, बोर,
कूपनलिका, तलाव यांनी तळ गाठला आहे. ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयला टँकर मागणीसंदर्भात पाठपुरावा केला आहे.
अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पाणी
विकत घेण्याची वेळ गुड्डापूरवासीयांना आली आहे. चारच दिवसांवर
गुड्डापूरचे ग्रामदैवत दानम्मादेवीची यात्रा चालू होणार आहे. कर्नाटक सहित महाराष्ट्रामधून यात्रेसाठी 5 ते
6 लाख भाविक येत असतात. त्यांना पाणीटंचाई चांगलीच
भासणार आहे. देवस्थानही विकतचे पाणी घेत आहे. देवस्थान सर्वतोपरी प्रयत्न करून यात्राकाळात पाणीटंचाई भासू नये म्हणून करत
आहे. या भागात पाऊस नसल्याने खरीप व रब्बीसह सर्व पिके वाया गेली
असल्याने शेतकरी; मात्र अडचणीत सापडला असून जनावरे कवडीमोल दराने
विकत आहेत.
No comments:
Post a Comment