Monday, November 26, 2018

राजे रामराव महाविद्यालयात संविधान दिन साजरा


(संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घटनेच्या सरनाम्याचे वाचन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे व प्राध्यापक.)
 जत,(प्रतिनिधी)-
संविधान हे भारतीय जनतेचे दीपस्तंभ असून भारतीय जनतेचा जगण्याचा आधार आहे. आपण 21 व्या शतकात वावरत असताना माणसांच्या मनातील जात आणि धर्म नष्ठ होत नाही. हे आपल्या भारतीयांचे दुर्दैव आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे यांनी केले.

          ते राजे रामराव महाविद्यालयाच्याराज्यशासत्रविभागाच्या वतीनेसंविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सी. वाय. मानेपाटील हे होते. याचवेळी डॉ. श्रीकांत कोकरे, प्रा. एस. डी. चव्हाण, प्रा. डॉ. भीमाशंकर डहाळके, प्रा.श्रीमंत ठोंबरे प्रमुख उपस्थित होते.
    मानवता हा एकच धर्म आहे हे भारतीय संविधानाने आपणास दिलेली देणगी आहे असे सांगून प्राचार्य पुढे म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करीत असताना प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे विचार केला आहे.  निव्वळ माणसाचा विचार न करता निसर्गातील प्रत्येक घटकांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे घटनेत केला आहे. जगामधील सर्वात मोठी लोकशाही राज्यघटना भारतीय असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असेही ते शेवटी म्हणाले.
  यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सी. वाय. मानेपाटील यांनी भारतीय राज्यघटनेचा आढावा घेऊन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्यासरनाम्याचेवाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन राज्यशास्त्र विभागातील प्रशिक्षणार्थींनीं  केले.

No comments:

Post a Comment