मातृ म्हणा, मदर म्हणा,
आई शब्दात जीव आहे पिता म्हणा, पप्पा म्हणा,
बाबा शब्दात जाणीव आहे सिस्टर म्हणा, दीदी म्हणा,
ताई शब्दात मान आहे ब्रो म्हणा, भाई म्हणा,
दादा शब्दात वचक आहे फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा, मित्रा शब्दात शान आहे एन्ड म्हणा, फिनिश म्हणा,
अंत शब्दात खंत आहे दीवार म्हणा, वॉल म्हणा,
भिंत शब्द जिवंत आहे रिलेशन म्हणा, रिश्ता म्हणा,
नातं शब्दात गोडवा आहे एनेमी म्हणा दुश्मन म्हणा, वैर शब्द जास्त कडवा आहे. हाय म्हणा, हॅलो म्हणा, हात जोडणे संस्कार आहे सर म्हणा,
मॅडम म्हणा, गुरु शब्दात अर्थ आहे ग्रँड पा,
ग्रँड माँ शब्दात काही मजा नाही आजोबा-आजीसारखे
सुंदर नाते जगात नाही गोष्टी सर्व सारख्या पण फरक अनमोल आहे अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे
भांडार आहे.
*****
किंमत करा त्यांची, जे तुमच्यावर नि:स्वार्थपणे स्नेह करतात. कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात.
*****
एका आठवड्याचे सात वार असतात. आठवा वार आहे परिवार तो ठीक असेल तर सातही वार सुखाचे जातील जन्म हा एका थेंबासारखा
असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम
एका त्रिकोणासारखे असतं; पण मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो,
परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात.
*****
‘ज्यांची‘ सुरवात
‘इमानदारी, स्वकष्ट आणि शून्या‘ पासून होते. त्यांना ‘हारण्याची,
घाबरण्याची, ओळख‘ निर्माण
करण्याची ‘गरज‘ आणि ‘भीती‘ नसते. त्या सर्व
‘गोष्टी‘ आपोआप मिळतात आपल्याला ‘किती‘ लोक ‘ओळखतात‘ याला ‘महत्व‘ नाही. तर ‘ते‘ आपल्याला ‘का‘ ‘ओळखतात‘ याला ‘महत्व‘ आहे.
*****
अहो, तुम्ही कुठे आहात?
आफीसमध्येच आहात ना? घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर
नवर्याला विचारले.. ‘हो... आफीसमधेच आहे मी..., का, काय झाले?‘
नवर्याने कळवळून विचारले..
‘नाही,
काही विशेष झाल नाही. आपली कामवाली बाई कोणा सोबततरी
पळून गेली आहे म्हणे, असं तिचा नवरा रडत सांगत आला आहे.
म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढच...!
गुरुजी: चंद्रावर पहिले
पाऊल कोणी टाकले?
बंड्या: नील आर्मस्ट्राँग
गुरुजी: बरोबर...आणि दुसरे?
बंड्या: तेनंच टाकलं आसल
की... ते काय लंगडं वाटलं व्हय तुम्हाला?
No comments:
Post a Comment