Thursday, November 22, 2018

ब्रिटीशांविरोधात शहीद झालेला टीपू सुलतान पहिला राज्यकर्ता: सर्फराज शेख


जत,(प्रतिनिधी)-
अवघ्या 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या टीपू सुलतान यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले योगदान मोलाचे असून ब्रिटीशांविरोधात लढून शहीद होणारा हा पहिला राज्यकर्ता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक सर्फराज शेख यांनी जत येथे टीपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
येथील शेर--हिंद, टीपू सुलतान जयंती उत्सव समिती, पैगंबर जयंती उत्सव आणि भारतीय संविधान गौरव दिन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालय चौकात सर्फराज शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मेहबुब कोथिंबिरे होते. यावेळी बोलताना श्री. शेख म्हणाले, आज केंद्रात आणि राज्यात जातीयवादी पक्ष सत्तेवर असल्याने शाहू,फुले, आंबेडकर आणि टीपू सुलतान यांचे विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आता संविधानच धोक्यात आले आहे. यासाठी देशातील नागरिकांनी सावध राहून प्रतिकार केला पाहिजे. बारा बलुतेदारांना मातीत गाढण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
टीपू सुलतान यांचे देशाच्या स्वातंत्र्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्य बहुमोलाचे आहे. व्यासंगी,चौफेर अभ्यासक असलेल्या या राजाने 44 पुस्तके लिहिली होती. युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, नौकाशास्त्र, धर्मशास्त्र,नीतीशास्त्र यांचे अभ्यासक होते. 1749 मध्ये इंग्रजाशी लढताना या राजाला वीरमरण आले.या राजाचे चरित्र लपवण्याचा प्रयत्न झाला आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रज्जाक नगारजी, संयोजन बंटी नदाफ यांनी केले तर आभार शफिक इनामदार यांनी मानले. यावेळी विक्रम सावंत,सुरेश शिंदे, अतुल कांबळे, प्रभाकर सनमडीकर, मकसूद नगारजी, पटू गवंडी, भूपेंद्र कांबळे,, नाना शिंदे, दयानंद मोरे, सद्दाम अत्तार आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment