जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अनेक गावांमधील मागासवर्गीय
लोकांवर अन्याय झाला असून त्यांना अद्याप न्याय न मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मातंग आघाडीच्यावतीने जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी
कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.
जत तालुक्यातील बाज येथील पिराजी आप्पाण्णा
ऐवळे यांना सुवर्ण गावगुंडांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या गुंडांवर अॅट्रासिटी दाखल करण्यात आली आहे.मात्र महिना झाला तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. शिवाय या दलित अत्याचार प्रकरणाातील साक्षीदार महादेव शंकर गडदे आणि संजय शिवाजी
बंडगर यांना घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देणे, रस्त्यात अडवून
मारहाण करणे आदी कृत्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास
धोका निर्माण झाला आहे.
पिराजी ऐवळे आणि दोघा साक्षीदारांचे
काही बरेवाईट झाल्यास पीएसआय रणजीत गुंडुरे हेच त्याला जबाबदार असतील. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टीच्यावतीने जत तहसील कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला होता. तरीही काही कारवाई होत नाही.
तसेच अंकले येथील सातबारा उताराबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.
पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता ए.एम. शेख यांनी दलितवस्तीमधील कामात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,
अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आरपीआयचे
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, किशोर चव्हाण, संजय कांबळे (पाटील),
सुभाष कांबळे, उत्तम कांबळे, भैराप्पा शिंगे, संभाजी चंदनशिवे, विक्रम ढोणे, धोंडीराम चंदनशिवे, शिवाजी ऐवळे, पिराजी ऐवळे,बाबासाहेब
कांबळे यांच्या सह्या आहेत.

No comments:
Post a Comment