Saturday, November 17, 2018

महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी काळम


सांगली,(प्रतिनिधी)-
 पीडित व अन्यायग्रस्त महिलांच्या न्यायासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्या सोमवारी राज्यस्तरीय व विभागीय स्तर, तिसर्या सोमवारी जिल्हास्तरीय व चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.
या महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, महिला लोकशाही दिनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज करता येतील. हे अर्ज महिलांविषयी वैयक्तिक स्वरुपाचे असावेत व हा अर्ज दोन प्रतीत असावा. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसलेले व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबींचे अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचा नसेल तर असे अर्ज महिला लोकशाही दिनामध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

No comments:

Post a Comment