Monday, November 26, 2018

जतमध्ये वृक्षलागवडीचा फज्जा


जत,(प्रतिनिधी)-
तासगाव तालुक्यात 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुमारे 50 हजार झाडे लावली, मात्र अजूनही तालुक्यात हजारो खड्डॅ वृक्षारोपनाविना रिकामेच पडले असल्याचे चित्र दिसत आहे. झाडे लावायची नव्हती तर हे खड्डे का काढले, कोणी काढले, याचे उत्तर कोणाकडेच नाही.हजारो खड्डे काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला याला जबाबदार कोण? हा निधी नक्की कोणाचा आणि किती हेही समजू शकत नाही.

सरकारी यंत्रणा किती ढिसाळ काम करतात आणि एखाद्या चांगल्या योजनेचा कसा बोर्या वाजवतात याचा उत्तम नमुना समोर आला आहे. जत तालुक्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अखेर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायतीपासून ते साध्या ग्रंथालयांपर्यंत सर्वांना वृक्षारोपणाचे उदिष्ट देण्यात आले होते.
मात्र ही मोहीम पार पडल्यानंतर आता या मोहिमेतील पितळ उघडे पडले आहे. अनेक ठिकाणी नुसते खड्डेच काढण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये झाडे लावलीच नाहीत. या वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला. हे सारे होऊनही दुर्दैवाने आज चित्र वेगळेच दिसत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे काढलेत मात्र त्यात झाडेच लावली गेली नाहीत. आज हे खड्डे तसेच मोकळे पडले आहेत.

No comments:

Post a Comment