Sunday, November 25, 2018

पाण्याचे टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन


मनसेचा इशारा

 जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भयानक पाणी टंचाई जाणवत असताना शासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. प्रशासकीय अधिकारी  उपाययोजना केल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत . मागणी करुनही एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला नाही. तालुका प्रशासनाने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक असणार्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले नाही तर मनसेच्या वतीने शासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जत तालुका मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

 जत तालुका मनसे पदाधिकार्यांची बैठक जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत व उपाध्यक्ष मुकेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली जत येथे नुकतीच संपन्न झाली या बैठकीस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.म्हैसाळ योजना  लाभ क्षेत्रात येत असलेल्या कुंभारी ( ता.जत ) या गावात पालक मंत्री सुभाष देशमुख यांनी  पाहणी केली प्रत्यक्षात हे गाव सिंचनाखाली येत आहेयेथे दुष्काळाची दाहकता दिसून येत नाही . परंत तालुक्याच्या  पूर्व भागात व दक्षिण आणि उत्तर भागात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या भागाची पाहणी करून त्याची माहिती शासनाला कळवीने आवश्यक होते.परंतु सिंचनाखाली येत असलेल्या भागाची पाणी करून प्रशासनाने दुष्काळी भागातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्ही निषेध करतो असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
 जत तालुक्यातील दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर मनसेचे प्रमुख पदाधिकारी जनसंवाद संपर्क दौरा करणार आहेत . यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांची मते जाणून घेऊन याची माहिती मनसे नेत्यांना आणि  शासनाला देणार आहेत .शासनाने यावर उपाययोजना केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून दुष्काळी भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पशुधन जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या किंवा थेट अनुदान देणे आवश्यक आहे. परंतु शासनाने त्या संदर्भात अद्याप कोणतीच उपाययोजना केलेली नाही.नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर मागणी करूनही अद्याप टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे . त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करावेत अशी मागणीही या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन तिचीगंभिर परिस्थितीची जाणीव करून देण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीसाठी तालुका अध्यक्ष  कृष्णा कोळी, उपाध्यक्ष शंकर बिचुकले, जत शहर अध्यक्ष  श्रीकृष्ण तळेकर, बलभीम पाटील,तालुका संघटक जयंत भोसले, मुन्ना चव्हाण, सुरेश बिळूर, मोहसीन शेख, शरद चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment