जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील हिवरे येथील भारतीय सैन्यातील मेजर बाळासो ज्ञानु सोलनकर
(वय 45 ) यांचे आसाममध्ये हृदय विकाराने
शुक्रवारी रात्री निधन झाले. ते आसाम मध्ये कार्यरत
होते. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री ९.०० वाजता पुणे येथे येणार आहे . अंत्यविधी
सोमवारी हिवरे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात
आई-वडील, पत्नी , दोन मुले व एक मुलगी
असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नुकताच सैन्यात भरती झाला आहे. दोन वर्षांपूर्वी
त्यांना मेजर पदी बढती मिळाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने हिवरे गावात शोककळा
पसरली आहे.

No comments:
Post a Comment