Wednesday, September 12, 2018

गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश...

गणपती ही संघटनेची देवता आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे आहे. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूतीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र , चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपयर्ंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.
सुखकर्ता दु:खहर्ता.. ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनीदेखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे. प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री सर्मथ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.भारतीय समाजामध्ये ऐक्य असावे या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे की स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्‍वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जन जागृती, लोक संघटन, लोक संग्रह या कारणासाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्‍वास परत येऊ शकेल. मात्र आता सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू बदलला आहे.

   

No comments:

Post a Comment