जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २0१८-२0२0 या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक वीजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर २0१८ पासून लागू झाला आहे.
सन २0१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरच्या विजेच्या दरात 0 ते १ टक्क्यांपयर्ंत वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर ३ रुपये २५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रति युनिट असे करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे 0 ते १00 युनिटसाठी ५ रु. 0७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १0१ ते ३00 युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रति युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चाजिर्ंग स्टेशनसाठी प्रति युनिट ६ रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) ७0 रुपये प्रति केव्हीए/ महिना असा ठरविण्यात आला आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठीचे दर खालील प्रमाणे
कंपन्या जुने दर (प्रति युनिट) नवीन दर (प्रति युनिट)
टाटा पॉवर ९ रु. १२ पैसे ९ रु. ३८ पैसे
अदानी इलेक्ट्रिसिटी १0 रु. 0७ पैसे ९ रु. ३७ पैसे
बेस्ट ८ रु. ६५ पैसे ८ रु. 0६ पैसे
महावितरण ८ रु. 0४ पैसे ८ रु. २0 पैसे
उच्च दाब वितरण (वाणिज्यिक वापर)
कंपन्या जुने दर (प्रति युनिट) नवीन दर (प्रति युनिट)
टाटा पॉवर ९ रु.७१ पै. ९ रु. ९0 पै.
अदानी १0 रु. ७६ पै. १0 रु. 0५ पै.
बेस्ट ९ रु. १७ पै. ८ रु. ५६ पै.
महावितरण १३ रु. ४७ पै. १३ रु. ८0 पै.
लघुदाब वितरण (छोटे उद्योगांसाठी)
कंपन्या जुने दर (प्रति युनिट) नवीन दर (प्रति युनिट)
टाटा पॉवर ८ रु. ३४ पै. ८ रु. १९ पै.
अदानी ९ रु. ३७ पै. ९ रु. ३७ पै.
बेस्ट ८ रु. ४३ पै. ७ रु. ५२ पै.
महावितरण ७ रु. ८३ पै. ८ रु. २५ पै.
इंधनापाठोपाठ विजेचा झटका
ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर वीजबील दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. इंधनापाठोपाठ विजेचा झटका बसला असून महागाईने हैराण झालेल्या राज्यवासीयांवर महावितरणचा भार वाढला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसणार्या महाराष्ट्रवासीयांना आता राज्य वीज नियामक आयोगाने झटका दिला आहे. महावितरणची वीज महाग झाल्यानं राज्यवासीयांच्या खिशावर भार पडणार आहे.
शेतीसाठी दिल्या जाणार्या विजेचा दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट होता. तो आता ३.५५ रुपये करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आला आहे. घरगुती वापरसाठीच्या विजेचा दर १00 युनिटपयर्ंत ५.0७ रुपये प्रती युनिट आणि १0१ ते ३00 युनिटपयर्ंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट होता. तो आता अनुक्रमे ५.३१ रुपये प्रती युनिट आणि ८.९५ रुपये प्रति युनिट होणार आहे.
No comments:
Post a Comment