सांगली:
सांगली येथे आज सकाळी झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.ही हाणामारी सभा सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाली. यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः उरावर बसून बेदम मारहाण करत होते. अलिकडे शांततेत पार पडणारी ही सभा पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकारामुळे शिक्षकी पैशाला काळिमा फासला गेला.
आज शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला. भ्रष्टाचार आणि अन्य काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दोन गट व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुर्च्याही फेकण्यात आल्या. या मारामारी वेळी कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्याने पुन्हा जोरदार राडा झाला. सभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. शिक्षकच मारामारी करू लागले तर ते विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment