Sunday, September 9, 2018

व्हॉटस् अ‍ॅप कट्टा: पूर्वीचा काळ



पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला,
 साधे घरं साधी माणसं कुठे होता बंगला ?
घर जरी पत्र्याचे तरी माणसे होती मायाळू,
साधी राहणी चटणी-भाकरी देवभोळी अन् श्रद्धाळू!
सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे !
 पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो !
हसत-खेळत गप्पा मारून शीण निघून जायचा हो !
श्रीमंती जरी नसली तरी एकटे कधी वाटले नाही,
खिसे फाटके असले तरीही कोणतेच काम थाबंले नाही.
उसने-पासने करायचे पण पोटभर खाऊ घालायचे
पैसे-आडके नव्हते तरीही मनमोकळं बोलायचे!
कणकीच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा असायचा
पत्रावळ जरी असली तरी पाट, तांब्या मिळायचा
 लपाछपी आबाधाबी, बिनपैशाचे खेळ हो
कोणीच कुठे नव्हते होता वेळच वेळ हो !
चिरेबंदी वाडेसुद्धा खळखळून हसायचे
निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे
सुख शांती समाधानतेआता कुठे दिसते का?
पॉश पॉश घरांमध्येतशीमैफिल सजते का?
नातेगोते घट्ट होते किंमत होती माणसाला,
 प्रेमामुळे चव होती अंगणातल्या फणसाला.
तुम्हीच सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम?
भावाकडे बहिणीचा असतो का हो मुक्काम?
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदंगाच्या तालावरती गाव आता डोलत नाही!
 प्रेम, माया, आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का?
 बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का?
तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली
श्रीकृष्णाच्या महालामधुनी सुदामाची सुट्टी झाली
हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असते वस्तुंचे
का बरे, विसर्जन झाले चांगुलपणाच्या अस्थींचे!

 *****

ऑफिसमधून थकून घरी आल्यावर मुलाने गुणपत्रिका पुढे केली.
 मराठी 38, इंग्रजी 35, गणित 40 पुढचे काही वाचण्यपूर्वीच मी ओरडलो, ‘गाढवा, लाज वाटते का काही? दगड आहेस नुसता दगड !‘
पत्नी : अहो, पण जरा ऐकता का?
मी : तू गप्प बस ! तूझ्या लाडानेच वाया जातो आहे तो.
नालायका! अरे बाप राबतो आहे आणि तुम्ही असे गुण उधळा!
 मुलगा खाली मान घालून गप्प. पत्नी : ‘अहो...‘
मी : ‘तू एक शब्द मध्ये बोलू नकोस...’
(शेवटी पत्नी चिडून) ’ऐका न जरा! सकाळी माळा साफ करताना सापडलेली तुमचीच गुणपत्रिका आहे ती.‘
 मग काय? भयाण शांतता



No comments:

Post a Comment