Wednesday, September 12, 2018

जतला पेट्रोल पंप कामगाराचा सव्वालाख घेऊन पोबारा


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील जत-विजापूर मार्गावरील संग्राम फ्युएल स्टेशनमधील (पेट्रोल पंप) कामगार अविनाश अनिल कोळी (वय 22,रा. निगडी खुर्द,ता.जत) याने पेट्रोल व डिझेल विक्री केलेले 1 लाख 35 हजार रुपये घेऊन पलायन केले. ही घटना बुधवारी घडली.या प्रकरणी पेट्रोल पंप चालक प्रमोद विलासराव जगताप यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अविनाश कोळी हा मागील महिन्याभरापासून संग्राम पेट्रोल पंपावर कामगार म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री त्याची रात्रपाळी होती. बुधवार सकाळपर्यंत त्याच्याकडे रात्रभर झालेल्या विक्रीतून 1 लाख 35 हजार रुपये जमा झाले होते. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्यादरम्यान इतर कामगारांना त्याने चहा पिऊन येतो, असे सांगून तिथून निसटला ते परत आलाच नाही. दरम्यान चालक श्री. जगताप यांनी रात्री उशिरा त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment