जत,(प्रतिनिधी)-
आमदार व खासदारांना ज्याप्रमाणे मानधन व पेन्शन दिली जाते, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि सदस्यांनाही मानधन व पेन्शन मिळावे, अशी मागणी बसर्गी (ता.जत) येथील उपसरपंच किशोर बामणे यांनी सांगली जिल्हाधिकारी व जत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्यात विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांच्या माध्यमातून गावांचा विकास होत आहे. या लोकांना सरपंच व सदस्यत्वाचा कालावधी संपल्यावर रोजीरोटीसाठी अन्यत्र काम शोधावे लागते. अनेक लोक ऊसतोड आणि वीटभट्टीवर जाऊन आपले पोट भरत असल्याचे वास्तव आहे. शिवाय अनेक सरपंच व सदस्यांची मालमत्ता अगदी नगण्य असून त्यांना रोजगार करून पोट भरण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे गोरगरीब ग्रामपंचायत सदस्यांना पेन्शनची गरज आहे. सरपंच व सदस्यांना महिन्याकाठी किमान पाच ते सहा हजार पेन्शन देण्यात यावी. ज्यांना समाजसेवेची आवड आहे, त्यांना या प्रवाहात राहण्यासाठी पेन्शनची गरज आहे, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment