जत,(प्रतिनिधी)-
गणपती उत्सवात 75 टक्के रस्ते रिकामे ठेवावेत. 2002 च्या नियमानुसार ध्वनि प्रदूषण टाळण्यासाठी 50 ते 55 टक्के स्पिकरचा आवाज ठेवण्यात व्यावा. सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कोणत्याही गणेश मंडळाकडून डॉल्बीचा वापर करू नये. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गणेश उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन जत व उमदी पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
जत व उमदी परिसरातील सर्व गणेश मंडळांच्या घेण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या बैठकीत असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सर्व गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे व त्यानंतर पोलीस स्टेशनकडे रजिस्ट्रेशन करावे. तसेच ग्रामपंचायतीची, नगरपरिषदेची, जागा मालकाची, एम एस सी बी ची परवानगी घेणे गरजेचे आहे. तरच मंडळ स्थापनेला परवानगी देण्यात येईल.तसेच सर्व मंडळांनी आपले देखावे वादग्रस्त विषयावरती नसावेत याची काळजी घ्यावी.
तसेच मंडळांनी 10 दिवसाच्या कार्यक्रमाची यादी पोलीस स्टेशनला देणे आणि जबरदस्ती कोणाकडूनही वर्गणी वसूल करू नये. अन्यथा त्या मंडळावरती कारवाई करण्यात येईल. तसेच प्राथमिक स्वरूपात या उत्सवा दरम्यान मोठमोठय़ा आवाजातील वाद्यांचा वापर केला जातो. तो मोठा अपायकारक असून मोठय़ा आवाजातील आधुनिक वाद्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका मोठय़ा प्रमाणात तयार होत. असून यामुळे अनेक आबालवृद्धांना याचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शासनाने वाद्यांच्या आवाजावरती 50 डेसिबलच्या वरती आवाज असणाऱया मंडळावरती कारवाई करण्यात येईल, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे सर्व गणेश उत्सव सर्वांनी डॉल्बीमुक्त स्वरूपात साजरा करावा. यावेळी लोकप्रतिनिधी,पोलीस अधिकारी, सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment