जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बोर नदीवरील खंडनाळ व
पांढरेवाडी दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यासाठी 76 लाखांचा निधी मंजूर झाला
असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार आणि इतर योजनांमधून पाणी
अडवा,पाणी जिरवा मोहिम जत तालुक्यात गतीने राबवली जात आहे.खंडनाळ-पांढरेवाडी दरम्यान बोरनदीवर कोल्हापूर पद्धतीच्या
बंधार्यासाठी स्थानिक स्तर योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे.
पाणी अडवल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
याशिवाय दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघात
जालिहाळ खुर्द,सिद्धनाथ,दरिबडची
आदी गावांमधील नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांसाठी
निधी प्रस्तावित आहे. त्यांनाही लवकरच निधी मंजूर होईल,
असेही श्री. पाटील म्हणाले.
No comments:
Post a Comment