Saturday, September 8, 2018

whatsup.आयुष्य बिनधास्त जगायचे.


आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही. कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो. आपण त्याच्या विषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतः बरोबर दुसर्याचे हीत चिंतायचे. कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही. ‘जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.‘ थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.

अरे तू ऑपरेशन थिएटरमधून पळून का आलास?
काय करू? ती नर्सघाबरु नका, नर्व्हस होऊ नका, लहान ऑपरेशन आहे, हिम्मत बाळगा...’ असे सारखे सारखे सांगत होती.’ ‘चांगलेच तर सांगत होती ना, मग पळून का आलास?’
अरे ती ते डॉक्टरांना सांगत होती ना!

No comments:

Post a Comment