संविधान सन्मान मोर्चासाठी जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक सांगलीला जाणार
जत,(प्रतिनिधी)-
दि.10 सप्टेंबर 2018 रोजी सांगली येथे होणाऱ्या संविधान सन्मान मोर्चासाठी जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने संविधानप्रेमी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती प्रभाकर सनमडीकर यांनी दिली.
दिल्ली येथील जंतर मंतर वर काही समाज कंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जे संविधान भारतीयांची अस्मिता आहे.बहूजन समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारी संजीवनी आहे. या संविधानाचा सन्मान सर्व भारतीयांनी केलाच पाहीजे.
म्हणून या संविधान सन्मान मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले. यावेळी बोलताना श्री.सनमडीकर म्हणाले, जत तालुक्यातील दहा हजारांहून अधिक लोक या सन्मान मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन समाजप्रबोधन करत आहेत. सर्वच पक्षाचे,धर्माचे लोक यात सामील होत आहेत. या मोर्चासाठी प्रतिसाद मोठा मिळत असून मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावचे कार्यकर्ते झटत आहेत. यावेळी अॅड. म्हाळाप्पा पुजारी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सनमडीकर, विक्रम ढोणे, अविनाश वाघमारे, अजित पाटील, अशोक बन्नेनवर, टी एम वाघमोडे,सुनिल सुर्यवंशी, राजू ऐवळे,अनिल मिसाळ, संजय कांबळे, अतुल कांबळे, भूपेंद्र कांबळे, इब्राहिम नदाफ, पट्टू गवंडी,सलीम गवंडी, बंटी नदाफ,राजू इनामदार, अरूण साळे, दत्तात्रय शिंदे, किरण शिंदे, दिनकर पतंगे, तुकाराम माळी, शिवशरण, जकाप्पा सर्जे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment