(शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा,यासाठी बसवराज पाटील यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले.) |
जत,(प्रतिनिधी)-
उमदी, माडग्याळ, संख, दरिबडची, मुचंडी, उमराणी, बिळुर, बसर्गी, डफळापूर (ता.जत ) या सह अनेक गावांतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी 2017 च्या खरीप हंगामातील पीक विम्याचा हप्ता भरूनही अनेक शेतकऱ्यास खरिप हंगामाचा पीक विमा मिळालेला नाही. तसेच तालुक्यातील इतर गावांना अर्धवट पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे सर्व वंचित शेतकऱ्यांना चार दिवसांत पीक विमा वाटप करावा, या मागणीसाठी बसवसेना अध्यक्ष तथा अ.भा.सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी तहसिलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.
सदर पीक विम्याबाबत बँकेत जाऊन काही शेतकऱ्यांनी चौकशी केली असता तुमच्या नावे रक्कमच आलेली नाही असे सांगितले जाते. तरी पीक विम्यापासून वंचित गावे तसेच अर्धवट पीक विमा मिळालेल्या गावातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन बसवसेना रस्त्यावर उतरेल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजिंक्य राक्षे, रविंद्र शेगावे, हणमंत लंगुटे, सुनिल आरगोडी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment