जत,(प्रतिनिधी)-
साल 2017-18 मध्ये जत तालुक्यातील 36 दिव्यांग शिक्षकांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दुचाकी वाहन अनुदान आले होते. परंतु,तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांना अनुदान वाटप करण्यात आले नव्हते. वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी जावीर यांच्या खाबुगिरी धोरणामुळे ही रक्कम पुन्हा सांगली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. आता यातील 12 शिक्षकांच्या जिल्ह्या बाहेर बदल्या झाल्या आहेत. उर्वरित 22 दिव्यांग शिक्षकांना तरी हे अनुदान देण्यात यावे,अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.

जत तालुक्यातील 36 दिव्यांग शिक्षकांकरिता सन 2017-18 मध्ये वाहना करता 50 हजार रुपये इतके अनुदान आले होते. पण गटशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शिक्षकांना या अनुदानापासून वंचित राहावे लागले. ही रक्कम परत जिल्हा परिषद सांगली कडे वर्ग करण्यात आली. पण दिनांक15 मे 2019 रोजी प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेषकार्य. विभाग मंत्रालय यांच्याकडील पत्रान्वये या अनुदानास 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे आता तरी हे अनुदान तालुक्यात राहिलेल्या 22 शिक्षकांना वाटप करण्यात यावे व संबंधित शिक्षणाधिकारी (सांगली) यांना तसे पत्र देऊन जत तालुक्यातील दिव्यांग शिक्षकांना त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
या वेळी सांगली जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब लाड, शशिकांत बजबळे, रमेश पाटील ,दयानंद मोरे, महादेव माळी, आप्पासाहेब जाधव, दीपक कोळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment