Thursday, June 27, 2019

सुपरफास्ट विराट


विराट कोहली म्हणजे क्रिकेट विश्वातलं अजब रसायन आहे. त्याने आजच्या क्रिकेट वेड्यांना सचिन, ब्रायन लारा यांचे खेळ विस्मृतीत न्यायला भाग पाडले. आक्रमक, आक्रस्ताळेपणा असलेल्या विराटच्या अंगी मात्र कमालीची चपळता आहे. क्रिकेटला प्रथम प्राधान्य देणारा विराट आपल्या प्रेमालाही तितकंच महत्त्व देत आपल्या चाहत्यांच्याही इच्छा पूर्ण करतो. आताचा त्याचा खेळ पाहिला तर अजून बरेच विक्रम त्याच्या नावावर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
त्याचा वेगवान खेळ त्याला विश्व विक्रमाचे बिरुद बरेच दिवस मिरवायलाही देणार आहे. कारण आजचा तो सुपरफास्ट क्रिकेटपटू आहे. इतका वेगवान खेळ आजच्या घडीला कुणामध्ये दिसत नसला तरी भविष्यात मात्र अशक्य नाही, असे नाही. कारण सचिनचा धावांचा विक्रम लवकर मोडला जाईल,याची शक्यता वाटत नव्हती,पण तो दिवस जवळ आला आहे. आताच त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. या विश्वचषकातही त्याने विक्रमी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विराटने 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 20 हजार धावांचा विक्रम विराटच्या नावे जमा झाला आहे.
   विराटने एकाचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात वेगवान आणि कमी वेळेत 20 हजार धावा करणारा विराट एकमेव खेळाडू ठरला. विराटने 417 व्या डावात हा विक्रम केला. तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोघांनीही 453 डावात 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता.
   वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराट 82 चेंडूत 72 धावा करुन बाद झाला. 20 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराटला केवळ 37 धावांची गरज होती. 20 हजार धावांपर्यंत पोहोचणारा विराट तिसरा भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील खेळाडूंमध्ये हा पराक्रम करणारा विराट 7 वा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 468 डावाता 20 हजार धावा पूर्ण केल्या.
   आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात कोहलीने 232 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने सध्या सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात सलग चौथ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विश्वकपमध्ये सलग चार वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा विराट तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी ग्रॅमी स्मिथ (2007) आणि अॅरोन फिंच (2019) यांनी ही कामगिरी केली आहे.
सर्वात कमी डावात  20 हजार धावा करणारा फलंदाज म्हणून विराटकडे पाहिले जाईल, कारण  त्याने अवघ्या 417 डावात हा पराक्रम केला आहे.
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना यासाठी 453 डाव खेळावे लागले आहेत. रिकी पॉन्टिंग 464 डाव, एबी डिव्हिलियर्स 483 डाव, जॅक कॅलिस 491 डाव
तर राहुल द्रविड याला 492 डाव खेळावे लागले आहेत.
विराटने आतापर्यंत 376 सामने आणि 417 डाव खेळले आहेत. यात त्याच्या 20 हजार 35 धावा झया आहेत. 66 शतके आणि 93 अर्धशतके ठोकलेल्या विराटची धावांची सरासरी 56.43 आहे. विराट हा भारतीय क्रिकेट विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्याकडे पाहून अनेक क्रिकेटपटू घडतील आणि यशस्वीही होतील. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment