जत,(प्रतिनिधी)-
शहरातील शिवाजी पुतळा चौक म्हणजे शहराचं हृदय
अशी ओळख! याच चौकात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची मराठी शाळा आहे. अलिकडे पाच वर्षात या चौकातून जाताना नेहमीच मुलाचा सुंदर किलबिलाट ऐकू येतो,नवखा माणूसही दोन मिनीटं इवल्या चिमुरड्यांच्या शाळेकडे नजर टाकल्याशिवाय पुढे जात नाही. खरेतर सहा वर्षापूर्वी अशी स्थिती होती की ही शाळा बंद पडते की काय? पण आपणाला आश्चर्य वाटेल हीच शाळा आज आयएसओ मानांकन प्राप्त झाली आहे. मातीच्या गोळ्याला आकार देणारे
गुरुदेव शिल्पकार जर एखाद्या शाळेला लाभले तर काय घडू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण!
आज शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग प्रगत होतो आहे. समाजात शिक्षणविषयी मोठी जागृती आली आहे. प्रत्येक पालकांस आपली मुले चांगली शिकली पाहीजेत अशी भावना निर्माण झाली आहे. शिक्षणात स्पर्धाही वाढते आहे. पण या स्पर्धेत खासगी शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव वाढले , निमशहरी व ग्रामीण भागातही खासगी शाळा सुरु झाल्या, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मोलमजूरी करणारी माणसंही श्रीमंतांच्या मुलांप्रमाणे हजारों लाखोंची फी भरून खासगी शाळांकडे आकर्षित होवू लागली. यातून मध्यंतरी गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या सरकारी तथा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पड़तात की काय असे वाटत असतानाच झेडपीच्या गुरुजींनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे भरारी मारली आहे. केवळ तालुक्यातच नव्हेतर जिल्ह्यात अनेक झेडपीच्या
शाळा गुणवत्तेच्या बाबतीत पुढे आहेत, ही बाब शिक्षणाच्या दृष्टीने समाधानकारक मानावे लागेल. तालुक्याचा विचार करता येथे सुमारे सातशे शाळा आहेत. यातील ऐंशी टक्के शाळांचा दर्जा अलिकडच्या दशकात उंचचावला आहे.
मोड़कळीस आलेली शाळा बनली आयएसओ
जत शहरातील जि. प. मराठी शाळा नंबर 1 ने नुकताच
आयएसओ मानांकन प्राप्त केला आहे. २०१३ साली या शाळेत अवधी साठ मुले होती. शिवाय चौकातली शाळा. शाळेला रंगरूपडे नसल्याने रात्री दुसरेच उद्योग चालायचे. त्यामुळे इथं येणारी मुलही कमी होत होती. अशातच संभाजी कोडग या शिक्षकाची नियुक्ती इथे झाली. प्रशासकीय कामात हातखंडा असणाऱ्या या शिक्षकाने ही शाळा तालुक्यात नव्हेतर जिल्ह्यात - लौकीक केल्याशिवाय गप बसणार नाही, अशी ठाम प्रतिज्ञा केली. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आज या शाळेने जत शहरातील सर्वच खासगी शाळांना मागे टाकले आहे. सरकारी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून झुंबर उडते, अशी ही जतेतील एकमेव शाळा आहे. यामागे येथे कार्यरत असणारे गुरूदेव शिक्षक मुख्याध्यापक संभाजी कोडग, विशाखा सावंत, आशा हावळे, वर्षादेवी जगताप, कविता आंबी, हणमंत मुजे, मिनाक्षी शिंदे, तत्कालीन शिक्षीका पल्लवी मालशंकर, सौ. जाधव यांनी केलेले कष्टच फळाला आले आहेत. शाळेचा परिसर विविध प्रकारच्या दोनशे झाडांनी बहरून गेला आहे. तर पटसंख्या तब्बल अडीचशेच्या वर गेली आहे. यंदा इथे पाचवीचा वर्ग सुरू होतो आहे.
ही आहेत खास वैशिष्ट्ये-
रचनात्मक अभ्यासक्रमासोबत शाळेत तुम्हाला नाविण्यपूर्ण प्रयोगशाळा, वाचनालय, ग्रंथसंपदा, संगणक कक्ष, भौतिक सुविधा, भौतिक मानके पाहयला मिळतील. तसेच वर्षभरात विविध उपक्रम, बदलत्या शिक्षण प्रणालीचा वेथ इथे घेतला जातो. सहल, क्रीडा स्पर्धा, अप्रगत मुलांचे ज्यादा तास, पालक संवाद सभा, मुले व पालक स्पर्धा, विविध कलागुणाचे उपक्रम, विदयार्थी बचत बैंक, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी असा वर्षभर ज्ञानदानाचा कुंड आनंदी व गुरूकुल पद्धतीने सुरू असल्याचा दिसतो. या शाळेचे आणखी खास वैशिये म्हणजे इथे गरीबांपासून श्रीमताच्या लोकांनी मुले शिक्षण घेतात. शिक्षणाची समानता, विद्यार्थ्याची गुणवत्ता हा निकष आहे. सरकारी गुरूजी काम करत नाहीत असे म्हणणाच्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही शाळा ठरली आहे. विशेष म्हणजे माझी शाळा, माझे विदयार्थी हीच आयुष्याची मोठी संपत्ती हा दंडक इथल्या गुरूदेव शिक्षकांचा आहे.
आयएसओचे सगळे निकष पूर्ण
शाळेने वर्षभरापूर्वी आयएसओसाठी प्रस्ताव दिला होता. तब्बल तीन तपासण्या, कड़क निकष, सहा महीन्याला भेटी, अनेक अटी, शर्थी पूर्ण करीत या शाळेने आयएसओ मानांकन 9001 : 2015 पर्यंत मजल म शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, पंचायत समितीचा शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षक संघटना, विदयार्थी, पालक यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याची भावना आहे.
केंद्रप्रमुख जयवंत दळवी म्हणाले, तालुक्यात पहिलीच
शाळा आयएओ मानांकन प्राप्त झाली आहे ही वाब गौरव करणारी आहे. तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा
दर्जा उंचावत आहेत. येणाया काळात अनेक शाळा मानांकनासाठी प्राप्त होतील.
सातवीपर्यंत शाळा करणार : कोडग
मुख्याध्यापक संभाजी कोडग म्हणाले, पूर्वी शाळा
सातवीपर्यंत होती. परंतु तीन वर्ग बंद पडले. आमच्याकडे आठ शिक्षक, अडीचशेहून अधिक विदयार्थी आहेत.यंदा पाचवीचा वर्ग सुरू करीत
आहोत. ही शाळा सातवीपर्यंत नेणे आमचे ध्येय आहे.
No comments:
Post a Comment