जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातून कृष्णा -कोयना या उपसा सिंचन असलेल्या म्हैसाळ आणि टेंभू योजनांद्वारा जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भाग वगळता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढ्यातील काही भागांना पाणी देण्यात आले आहे. मात्र जत तालुक्यातील पूर्व भागातील गावे वंचित राहिली आहेत. या गावांना भीमा नदीतून आरळी पाणी उपसा सिंचन योजना राबवून पाणी देण्याची मागणी जत तालुक्यातून होत आहे.
जत तालुक्यातील पूर्व भागातल्या 46 गावांना कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर पाणी देण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून यासाठी फारसा प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे जतच्या पूर्व भागातील गावांसाठी नवी योजना राबविण्यात यावी अथवा म्हैसाळ योजनेचे पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकातील होळ संख येथून चडचण लिगट इरिगेशन प्रकल्प करणे चालू आहे.याचप्रमाणे सोलापूर जिल्हयातील आरळी येथिल भिमा नदीवर प्रकल्प राबवून संदिरा पाईपलाईनद्वावरे पाणी मंगळवेढा तालुक्यातून आरळी- नांदूर- कात्राळ- हुलती-लंवगी-उमदी (फक्त 30 किलोमीटर )असे पुढे जत तालुक्याच्या पूर्व भागात नेल्यास, सिंचन योजना पासुन वंचित राहिलेल्या कायम दुष्काळी मंगळवेढा आणि जत तालुक्याचा पूर्व भागातील तलाव या योजनेतून भरू शकतील यामुळे येथील शेत जमीन ओलिता खाली येवू शकते.
मंगळवेढा तालुक्यातील भिमा नदीवर आरळी हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव असून येथून लगेच कर्नाटक राज्यास सुरवात होत असल्यामुळे ह्या नदीचे पाणी कर्नाटकात निघून जाते त्यामुळे हे भिमानदीचे पाणी येथून लिफ्ट इरिगेशन पध्दतीद्वावर उचल्यास आपल्या महाराष्ट्रातील भागातील शेतीला भरपूर फायदा होऊ शकतो, म्हणून आरळी लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाची योग्य तो सर्व्हे करून या प्रकल्पास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी जतच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
इच्छा पाहिजे, पानी तर सगळीकडे आहे पण आणण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती कोणाकडेही नाही निवडणुकी पुरता स्टंट आहे.
ReplyDelete