राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सांगली जिल्हा
शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सांगली
येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष तथा
सांगली जिल्हाध्यक्ष गणेश मडावी होते. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून
विजयकुमार सोनवणे यांची, तर बाबासाहेब माने यांची सचिव म्हणून
निवड झाली आहे.
कोषाध्यक्ष म्हणून उत्कर्ष कवठेकर यांची निवड झाली
आहे.
निवडीनंतर सर्व कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकार्यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. नूतन कार्यकारिणी
याप्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून महेंद्र येलूरकर, जिल्हा उपाध्यक्षपदी
दिनेश खाडे, संजय सदामते, धनंजय गाडे,
मुख्य संघटक म्हणून संदेश बोताल, अति. सरचिटणीसपदी शैलेंद्र पेंडे, विजयकुमार नलवडे,
राहुल जाधव, संघटक सचिव म्हणून सुशांत कांबळे,
रामगोंड जत्ते, प्रमोद बनसोडे, महिला प्रतिनिधी म्हणून रेखा माने, पुष्पा कदम
कार्यकारिणी सदस्य म्हणून सुशांत होवाळ, विष्णू माने, रॉबिन ठोंबरे, अर्जुन
धायगुडे, कार्यालयीन सचिव म्हणून गणेश काकडे, सल्लागार मार्गदर्शक सर्जेराव जाधव, कायदा सल्लागार अॅड. शिवाजी कांबळे यांची निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी म्हणाले, सामाजिक बांधिलकी
ठेवून समाजाला शासनाच्या योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचारी या नात्याने
सतत प्रयत्नशील असावे. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना संघटनेचे महत्त्व सांगून सर्वांनी एकजुटीने काम करून कर्मचारी व समाजाला
न्याय मिळून देण्याची आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे, हे विसरून
चालणार नाही, असे मत मडावी यांनी व्यक्त केले. यावेळी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद लांडगे,
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बाजीराव प्रज्ञावंत, कृषी अधिकारी अशोक मालगार,
संजय शिंदे, शिवाजी जोशी, रमेश सोनवणे, दीपक बनसोडे, गणेश
पवार,अविनाश पाटील, सिद्राम कोळी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment