Wednesday, June 19, 2019

जत तालुक्याच्या वाट्याचे म्हैसाळ योजनेचे पाणी दरवर्षी मिळावे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळ असला तरी पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, मात्र अद्याप पूर्व भागात पाणी आलेले नाही. योजनांची कामे झाली नसल्याने तालुक्याच्या वाट्याचे पाणी तालुक्याला मिळत नाही. त्यामुळे तालुक्याच्या पीक पाण्याची अवस्था एकदम गंभीर आहे. तालुक्यात सर्वत्र योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, आणि तालुक्याच्या वाट्याचे पाणी दरवर्षी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सत्ताधारी किंवा राजकीय पक्ष सातत्याने पाण्याचा मुद्दा निवडणुकीच्या काळात उचलत असतात. आश्वासन देतात, निवडणुकीनंतर  मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे गेल्या पन्नास साठ वर्षांपासून जत तालुका पाण्यासाठी असुसलेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमीची कामे ही बंद आहेत. याची दखल मात्र कुणी घ्यायला तयार नाही. ’म्हैसाळच्या वाट्याचे पाणी द्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत, कवठेम हांकाळ तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचा जन्म झाला. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आले नाही. हे पाणी अन्य तालुक्यांतील नेत्यांनी पळविले.
जत तालुक्याच्या वाट्याला जेवढेम्हैसाळचे पाणी आहे तेवढे दरवर्षी मिळत नाही. या पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक तालुक्याला पाणी देण्याचे नियोजन करण्यात यावे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनाही आपण किती पाणी वापरतो, हे समजेल. जत तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावांमध्ये पाणी आले आहे, तलाव भरले आहेत. या परिसरातील शेतकर्यांनीही पाण्याचा जपून वापर करावा, तर पाटाने पाणी न देता ठिबक सिंचनाचा वापर करा, असे आवाहनही करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment