जत,(प्रतिनिधी)-
सुमारे दहा वर्षांपासून पोलीसांना चकवा देणाऱ्या आरोपीस जत पोलीसांनी आज शिताफीने पकडले. 2009 मध्ये दाखल बलात्काराच्या गुन्हयांत अटक केलेला आरोपी विलास हणमंत हजारे (रा. हजारवाडी, सिंगणापुर ता.जत) हा न्यायालयात सुमारे १० वर्षापासुन सुनावणी कामी हजर राहत नव्हता.
जत न्यायालयाने त्याचे विरुध्द अटकेचे वॉरंट काढले असताना सुध्दा तो वॉरंट बजावणी टाळत होता. आज सोमवारी सहा. पोलीस फौजदार शंकर पवार यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हा सिंगणापुर गावात येणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रणजीत गुंडरे, सहा. पो. फौजदार पवार, पोलिस हवालदार राजेंद्र पवार (चालक), पोलीस कॉन्स्टेबल महेश मुळीक यांनी सापळा रचुन आरोपी विलास हजारे यास ताब्यात घेवुन न्यायालयाकडील अटकेचे वॉरंटमध्ये अटक केली आहे. उद्या मंगळवारी त्यास जत न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली.
No comments:
Post a Comment